Blogs

Pull up a chair and stay a while.

Blogs-image

Friday Focus by SPMESM (175)

"No one can whistle a symphony. It takes a whole orchestra to play it!"- H E Luccock.दुष्काळाची छाया पडलेल्या गावातील युवकांसाठी, त्यांना रोजगार मिळेल असं कांही तरी काम करावं, अशी चर्चा आमच्या फिल्ड वर्कर्सनी सुरु केली. त्यांनीच उपाय सांगितला की अर्थमुव्हिंग इक्विपमेंट (जेसीबी/ पोकलेन इत्यादी) चे ऑपरेटर म्हणून या मुलांना प्रशिक्षित केलं तर त्यांना लगेच रोजगार मिळू शकेल. पण यासाठी बऱ्याच गोष्टी जुळवून आणाव्या लागणार होत्या. दरम्यान मुंबईच्या वात्सल्य ट्रस्टने यात आधीच काम सुरु केले होते. छत्रपती संभाजीनगरला हा प्रशिक्षण वर्ग सुरु केला तर आम्ही मदत करू असं आश्वासन त्यांच्याकडून मिळालं. संस्थेचे मित्र शैलेश पार्ते यांनी हाँगकाँगचे संतोष जगताप यांना जोडून दिलं. त्यांनीही कांही आर्थिक मदत केली. संस्थेकडे एक पोकलेन मशीन देणगी मिळालेले आहे, पण दुसऱ्या प्रकारच्या यंत्रासाठी (जेसीबी) हुबळीचे देशपांडे फाउंडेशन आणि अंबाजोगाईचे मानवलोक हे मदतीला आले. छत्रपती संभाजीनगरातील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर प्रशिक्षण घेता आले. पाहता पाहता २० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले. या मुलांच्या प्रशिक्षणाबरोबरच निवास, भोजन, सुरक्षा साधनांचे संच आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण याचीही व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती. लवकरच त्यांना शिकाऊ परवाना देखील मिळेल. सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांतून महत्त्वाचे विषय पटकन पुढे जातात. समन्वय आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण म्हणवून या प्रशिक्षण वर्गाकडे पाहता येईल.

Blogs-image

Friday Focus by SPMESM (174)

प्रशिक्षित आरोग्य मित्रामुळे नवजात बालकाला मिळाले जीवदान२४ आ‌क्टोबरच्या पहाटेची वेळ. एकलहरा गावातील एका महिलेला आपल्या शेताजवळ रस्त्यावर रक्ताचे डाग दिसले. एखादं जनावर आसपास असेल अशा शंकेनं इकडंतिकडं पहात असताना एका लहान बाळाचं अशक्त रडणं त्यांना ऐकू आलं. जवळ जाऊन पाहिलं तर एक नवजात अर्भक- अगदी नाळ देखील नीट कापलेली नाही, अशा अवस्थेतील- शेतात उघड्यावर कुणीतरी सोडून देऊन गेलं होतं. काय करावे या विचारात असताना त्या महिलेला एकदम आठवलं- कमलबाई जाधव याला वाचवू शकतील. त्यांनी त्यांना बोलावणं पाठवलं. कमलबाई, सावित्रीबाई फुले मंडळाच्या संजीवनी प्रकल्पाच्या प्रशिक्षित आरोग्यमित्र म्हणून परिसरात आरोग्य सुविधा पुरवतात. त्या धावतच आल्या. येतायेताच त्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना फोन केले. पटकन् निर्जंतुक ब्लेडने बाळाची योग्य पद्धतीने नाळ कापली, बाळाला स्वच्छ करून उबदार कपड्यात लपेटून थंडीपासून वाचवले. तेवढ्यात पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला रूग्णालयात नेले. कमलबाई नसत्या तर त्या दुर्दैवी अर्भकाचे प्राण वाचले नसते! डॅाक्टर व पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. बाळ आता शासकीय बालगृहात सुखरूप आहे. कमलबाईंसारख्या आरोग्य मित्र संजीवनी प्रकल्पाद्वारा ९८ गावांत महत्त्वपूर्ण प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवत आहेत. या प्रकल्पाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या विप्रो आणि यावर्षीपासून या प्रकल्पाला पुढे नेण्यात मदत करणाऱ्या कॅनपॅक या आमच्या सहयोगी कंपन्यांचे मनःपूर्वक आभार.

Blogs-image

Friday Focus by SPMESM (173)

आत्मविश्वास, उपजीविका, स्थैर्य, भविष्याची आशा आणि आनंद! उपेक्षित वस्तीतील महिलेसाठी सक्षमीकरण म्हणजे अजून दुसरं तरी काय?पुष्पा जाधव यांचं या व्हिडीयोतील मनोगत ऐकलं की याची प्रचिती येते. रोहिदासपुरा इथं सावित्रीबाई फुले मंडळाचा प्रगती कौशल्य विकास प्रकल्प चालतो. तिथं बेसिक व ॲडव्हान्स टेलरिंग असे दोन्ही कोर्सेस त्यांनी पूर्ण केले. अगदी शून्यातून सुरुवात करत त्या आता कशी झेप घेत आहेत; स्वतःबरोबर इतर महिलांनाही विकासाची संधी कशी देत आहेत, हे त्यांच्याच शब्दांत ऐकायला हवं! पुष्पाताई या बदलाबद्दल सावित्रीबाई फुले मंडळाला धन्यवाद देतात. पण ॲटलस कॅाप्को इंडिया लिमिटेड, पुणें, जय शिवशक्ती हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन, बंगलुरु आणि निहचल इसरानी फाऊंडेशन, मुंबई या आमच्या प्रायोजक संस्थांना याचं महत्त्वाचं श्रेय जातं! मंडळाच्या कौशल्य प्रशिक्षण विभागातून दरवर्षी २५००+ महिला व युवकांना स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत होते!व्हिडियो सौजन्य- दीपा मेहरा, सेवा इंटरनॅशनल फेलो, सावित्रीबाई फुले मंडळ. VIdeo Link:- https://www.facebook.com/spmesmandal/videos/330341233169057

Blogs-image

Friday Focus by SPMESM (172)

मंजिले क्या है रास्ता क्या हैहौसला हो तो फासला क्या है..(आलोक श्रीवास्तव)संध्या ज्ञानेश्वर शिंदे, नरला ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतमजूरी करणारी महिला.गरीबी, अगदी मोडकळीस आलेली झोपडी आणि अशा शंभर अडचणींनी कठीण परिस्थिती झालेली. सावित्रीबाई फुले मंडळाने ८०००० रु कर्जस्वरूपात व १३००० रु रोख मदत देऊन त्यांच्यासाठी एका सौर वाळवण संयंत्राची (सोलर ड्रायर) व्यवस्था केली. तसेच त्यांना शेतमाल वाळवण्याचे प्रशिक्षणही दिले.  सुरुवातीला घरातून कामाला विरोध झाला परंतु काम सुरू झाल्यानंतर महिनाभरातच त्यांच्या अकाउंटला ८/९ हजार रुपये मिळाले. तेव्हापासून सर्वांचे सहकार्य मिळू लागले. स्वतःची शेती नसल्यामुळे पूर्वी त्यांना मजूरीवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यात श्रम जास्त व मोबदला कमी असायचा. आता घरातल्या घरात उद्योग मिळाला व मानसिक व शारीरिक श्रम ही कमी होण्यास मदत झाली.  कमाई वाढली. तीन वर्षांमध्ये संध्या यांना दरवर्षी अंदाजे १ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळाले. त्या नियमित कर्जफेड तर करत आहेतच, यासोबतच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून (PMFME) त्यांना २८००० रु अनुदानही मिळाले. १०२१ ला त्या मंडळाच्या ‘चाफा’ या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ सभासद झाल्या. स्वतःच्या हिंमतीवर व कमाईवर त्या आता आपले घरही बांधत आहेत.संध्याताईंसारख्याच एकूण २६०० महिला भाज्या वाळवणातून उत्तम कमाई करत आहेत! यासाठी सायन्स फॅार सोसायटी, डीबीएस व इतर अशा मान्यवर संस्थांचे मार्गदर्शन व मदत लाभली आहे.

Blogs-image

Friday Focus By SPMESM (171)

"इतरत्र टंचाई पण आम्हाला पुरेसे पाणी आहे"- गोरख वाघ, शेतकरी, चौका ता. जि. छत्रपती संभाजीनगर. गोरख वाघ यांच्याप्रमाणेच या गावातील इतर शेतकरीही आनंदी आहेत. सावित्रीबाई फुले मंडळाच्या जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे चौका येथे गेली कांही वर्षे सातत्याने भरपूर काम झाले आहे. यावर्षी गोरख यांच्या शेतानजिकच्या नादुरुस्त तलावाच्या भिंतीच्या पायाशी ‘कट्- आ‌ॅफ ट्रेंच’ पद्धतीने गळती थांबवली. त्यामुळे त्यात पाणी साठायला लागले. जो काही पाऊस झाला, त्यातून भूजलस्तर चांगला वाढला. विहीरींना पाणी आले व इतरत्र पाणीटंचाईचा अंदाज असताना इथे मात्र रबीच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे!जलसमृद्धीतून शाश्वत विकासाकडे जाण्याच्या मंडळाच्या प्रयत्नांना चौका ग्रामस्थ आणि एबीइनबेव्ह कंपनी यांची साथ लाभली.

Blogs-image

Friday Focus By SPMESM (170)

"विश्व गगन पर फिर से गूंजे ,भारत माँ की जय जय जय। बढ़ते जायें हो निर्भय ,बढ़ते जायें हो निर्भय।।” 150 boys and girls from various city slums were chanting this patriotic song and the hills opposite to their camp site were echoing them.. as if the hills too were agreeing to their patriotism!The occasion was a 3 Days’ Personality Development Camp for the participants of SPMESM’s Vidyarthi Vikas Project, Kishori Vikas Project and Siddharth Vidyarthi Vikas Project at the picturesque hills near the world famous Ellora Caves. The camp provided personality development opportunities with Games, Yoga, Trekking and many more interesting activities. Sonal, a participant of this camp is sharing her experiences in this small video. Special thanks to Canpack India Pvt Ltd and Minex Foundation for their support to these vital projects. Video Link :- https://fb.watch/oXTWPVRTiT/

Blogs-image

Friday Focus by SPMESM (169)

एकश्चार्थान् न चिन्तयेत् - विदुर नीती. (महत्त्वाच्या विषयांवर एकट्याने चिंतन करू नये) गेल्या कांही वर्षांत, कोविडनंतर तर अधिकच तीव्रतेने; समाजात मानसिक आरोग्याची स्थिती सातत्याने ढासळत चालली आहे. तणाव, आत्महत्या, व्यसनं, हिंसाचार आणि मानसिक आजार यांवर सामूहिक पातळीवर मोठा लढा उभारावा लागणार आहे. सावित्रीबाई फुले मंडळ गेल्या १५ वर्षांपासून या विषयात काम करत आहे. विप्रो केअर्स च्या मदतीने चालणाऱ्या मंडळाच्या अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाने मानसिक आरोग्यातील स्वयंसेवी कार्यकर्ते- मानसमित्र- यांची साखळी उभी केली व त्यातून विविध उपक्रम चालू आहेत. सामूहिक मानसिक आरोग्य विषयात एकत्रित विचारमंथन होण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या रविवारी (दि. ३) अरुणोदय प्रकल्पाच्या वतीने तज्ञांची एक कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यासंबंधी हा छोटा व्हिडीयो. https://www.facebook.com/spmesmandal/videos/1780361445720936

Blogs-image

Friday Focus by SPMESM (168)

हे आमच्यासाठी जणू अमृतच आहे! - दगडूभाऊ वाघ, चौका, ता. जि. संभाजीनगर. स्वच्छ, शुद्ध पेयजल ही समस्या सर्वत्र आहे. ग्रामीण भागात तर अधिकच. जंतू व हानिकारक क्षार विरहित पिण्याचं पाणी विकत घेणं सर्वांनाच परवडत नाही. त्यामुळं जलजन्य आजार सर्रास दिसतात. सावित्रीबाई फुले मंडळाने अमृतजल प्रकल्पाद्वारे गेल्या दोन वर्षांत २० गावांत शुद्ध पेयजलासाठी आरओ प्लांटस व वॅाटर एटीएम बसवले आहेत. सुमारे १२००० ग्रामीण जनतेला त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळत आहे; ते ही अगदी नाममात्र शुल्कात! या शुल्कातून ग्रामपंचायती पुढे या संयंत्राची देखभाल करतात. या महत्त्वाच्या उपक्रमामुळे या २० गाावंतील लोक विशेषतः महिला आनंदल्या आहेत. मुंबईस्थित सीसीआयएल कंपनीचे विशेष आभार. त्यांच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे. Video Link:- https://www.facebook.com/spmesmandal/videos/649784797067254/

Blogs-image

Friday Focus by SPMESM (167)

"कोशिशें जारी रख, कुछ कर ग़ुज़रने की.. जो आज है थमा थमा सा, चल निकलेगा.. कोशिश कर, हल निकलेगा.. आज नहीं तो कल निकलगा..” - आनंद परम रेखा जाधव आणि तिच्या दोन बहिणी यांच्या जिद्दीची, प्रयत्नांची आणि परिस्थितीवर विजय मिळवण्याची ही प्रेरक कहाणी! प्रपंच चालवण्यासाठी चार घरांत घरकाम करणं कष्टप्रदही होतं आणि परवडणारं ही नव्हतं. पण इलाज दिसत नव्हता. सावित्रीबाई फुले मंडळाच्या टेलरिंग प्रशिक्षणाच्या रुपानं एक उत्तम मार्ग सापडला. दोघींनी बेसिक व ॲडव्हान्स टेलरिंग कोर्स नाममात्र शुल्कात जिद्दीने पूर्ण केले. त्यांना प्रशिक्षकांनी कोर्सच्या वेळा मागेपुढे करून शिकायची विशेष परवानगीही दिली. कारण प्रशिक्षणाची व त्यांची घरकामांना जाण्याची वेळ एकच येत होती. आपल्यासाठी संपूर्ण बॅचचा वेळ बदलला हे ऐकून दोघींना प्रचंड आनंद झाला. दोघींनी दिवसभर कष्ट करून, प्रसंगी दुपारी न जेवता रोज यशस्वीपणे क्लास पूर्ण केला. आता रेखा ही चांगली डिझाईनर म्हणून व तिची बहीण परिसरामध्ये उत्तम ब्लाऊज शिवणारी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. मंडळाच्या प्रगती कौशल्य प्रशिक्षण वर्गांत दरवर्षी २५०० जणींची स्वप्न अशी पूर्ण होतात. या कार्यातील आमचे सहयोगी जय शिवशक्ती हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन; वात्सल्य ट्रस्ट आणि ॲटलस कॅाप्को इंडिया लिमिटेड यांचे विशेष आभार!

Blogs-image

Friday Focus by SPMESM (166)

"जब प्रेम के दीपक जलते हों, सपने जब सच में बदलते हों, मन में हो मधुरता भावों की. जब लहके फ़सलें चावों की, उत्साह की आभा होती है, उस रोज़ 'दिवाली' होती है.."  - भारतरत्न अटलबिहारी वाजपेई. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा, प्रकाशाचा उत्सव दिपावली! आनंद, सहभागीता आणि बंधु्त्वाला अधोरेखित करणारा सण! सावित्रीबाई फुले मंडळाच्या टीम्स दरवर्षी कांही नाविन्यपूर्ण आणि सामाजिक आशय प्रकट करणाऱ्या उपक्रमांसह दिपावली साजरी करतात. यावर्षी मंडळाच्या जालना टीमने दिव्यांगासोबत दिवाळी साजरी केली! दिव्यांगोंके साथ दिपावली या कार्यक्रमात २०० दृष्टीबाधित दिव्यांग बांधव व त्यांच्या परिवारजनांनी उत्साहाने सहभागी होत विविध कला- कौशल्यांचे सादरीकरण केले. जिल्ह्यात दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी जागृती व्हावी हा हेतू साध्य झाला. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात जागृतीचा- विकासाचा- आरोग्याचा प्रकाश घेऊन येवो; ही शुभेच्छा!

Donate Now