“इतरत्र टंचाई पण आम्हाला पुरेसे पाणी आहे”- गोरख वाघ, शेतकरी, चौका ता. जि. छत्रपती संभाजीनगर.
गोरख वाघ यांच्याप्रमाणेच या गावातील इतर शेतकरीही आनंदी आहेत. सावित्रीबाई फुले मंडळाच्या जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे चौका येथे गेली कांही वर्षे सातत्याने भरपूर काम झाले आहे. यावर्षी गोरख यांच्या शेतानजिकच्या नादुरुस्त तलावाच्या भिंतीच्या पायाशी ‘कट्- आॅफ ट्रेंच’ पद्धतीने गळती थांबवली. त्यामुळे त्यात पाणी साठायला लागले. जो काही पाऊस झाला, त्यातून भूजलस्तर चांगला वाढला. विहीरींना पाणी आले व इतरत्र पाणीटंचाईचा अंदाज असताना इथे मात्र रबीच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे!
जलसमृद्धीतून शाश्वत विकासाकडे जाण्याच्या मंडळाच्या प्रयत्नांना चौका ग्रामस्थ आणि एबीइनबेव्ह कंपनी यांची साथ लाभली.
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022