आत्मविश्वास, उपजीविका, स्थैर्य, भविष्याची आशा आणि आनंद! उपेक्षित वस्तीतील महिलेसाठी सक्षमीकरण म्हणजे अजून दुसरं तरी काय?
पुष्पा जाधव यांचं या व्हिडीयोतील मनोगत ऐकलं की याची प्रचिती येते.
रोहिदासपुरा इथं सावित्रीबाई फुले मंडळाचा प्रगती कौशल्य विकास प्रकल्प चालतो. तिथं बेसिक व ॲडव्हान्स टेलरिंग असे दोन्ही कोर्सेस त्यांनी पूर्ण केले. अगदी शून्यातून सुरुवात करत त्या आता कशी झेप घेत आहेत; स्वतःबरोबर इतर महिलांनाही विकासाची संधी कशी देत आहेत, हे त्यांच्याच शब्दांत ऐकायला हवं!
पुष्पाताई या बदलाबद्दल सावित्रीबाई फुले मंडळाला धन्यवाद देतात. पण ॲटलस कॅाप्को इंडिया लिमिटेड, पुणें, जय शिवशक्ती हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन, बंगलुरु आणि निहचल इसरानी फाऊंडेशन, मुंबई या आमच्या प्रायोजक संस्थांना याचं महत्त्वाचं श्रेय जातं!
मंडळाच्या कौशल्य प्रशिक्षण विभागातून दरवर्षी २५००+ महिला व युवकांना स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत होते!
व्हिडियो सौजन्य- दीपा मेहरा, सेवा इंटरनॅशनल फेलो, सावित्रीबाई फुले मंडळ.
VIdeo Link:- https://www.facebook.com/spmesmandal/videos/330341233169057
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022