"जब प्रेम के दीपक जलते हों, सपने जब सच में बदलते हों,
मन में हो मधुरता भावों की. जब लहके फ़सलें चावों की,
उत्साह की आभा होती है, उस रोज़ 'दिवाली' होती है.."
- भारतरत्न अटलबिहारी वाजपेई.
तिमिरातून तेजाकडे जाण्याचा, प्रकाशाचा उत्सव दिपावली! आनंद, सहभागीता आणि बंधु्त्वाला अधोरेखित करणारा सण!
सावित्रीबाई फुले मंडळाच्या टीम्स दरवर्षी कांही नाविन्यपूर्ण आणि सामाजिक आशय प्रकट करणाऱ्या उपक्रमांसह दिपावली साजरी करतात.
यावर्षी मंडळाच्या जालना टीमने दिव्यांगासोबत दिवाळी साजरी केली!
दिव्यांगोंके साथ दिपावली या कार्यक्रमात २०० दृष्टीबाधित दिव्यांग बांधव व त्यांच्या परिवारजनांनी उत्साहाने सहभागी होत विविध कला- कौशल्यांचे सादरीकरण केले. जिल्ह्यात दिव्यांगांच्या प्रश्नाविषयी जागृती व्हावी हा हेतू साध्य झाला.
ही दिवाळी सर्वांच्या जीवनात जागृतीचा- विकासाचा- आरोग्याचा प्रकाश घेऊन येवो; ही शुभेच्छा!
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022