Friday Focus by SPMESM (167)

“कोशिशें जारी रख, कुछ कर ग़ुज़रने की..

जो आज है थमा थमा सा, चल निकलेगा..

कोशिश कर, हल निकलेगा..

आज नहीं तो कल निकलगा..”

- आनंद परम

रेखा जाधव आणि तिच्या दोन बहिणी यांच्या जिद्दीची, प्रयत्नांची आणि परिस्थितीवर विजय मिळवण्याची ही प्रेरक कहाणी!

प्रपंच चालवण्यासाठी चार घरांत घरकाम करणं कष्टप्रदही होतं आणि परवडणारं ही नव्हतं. पण इलाज दिसत नव्हता.

सावित्रीबाई फुले मंडळाच्या टेलरिंग प्रशिक्षणाच्या रुपानं एक उत्तम मार्ग सापडला. दोघींनी बेसिक व ॲडव्हान्स टेलरिंग कोर्स नाममात्र शुल्कात जिद्दीने पूर्ण केले. त्यांना प्रशिक्षकांनी कोर्सच्या वेळा मागेपुढे करून शिकायची विशेष परवानगीही दिली. कारण प्रशिक्षणाची व त्यांची घरकामांना जाण्याची वेळ एकच येत होती. आपल्यासाठी संपूर्ण बॅचचा वेळ बदलला हे ऐकून दोघींना प्रचंड आनंद झाला. दोघींनी दिवसभर कष्ट करून, प्रसंगी दुपारी न जेवता रोज यशस्वीपणे क्लास पूर्ण केला.

आता रेखा ही चांगली डिझाईनर म्हणून व तिची बहीण परिसरामध्ये उत्तम ब्लाऊज शिवणारी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे.

मंडळाच्या प्रगती कौशल्य प्रशिक्षण वर्गांत दरवर्षी २५०० जणींची स्वप्न अशी पूर्ण होतात. या कार्यातील आमचे सहयोगी जय शिवशक्ती हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन; वात्सल्य ट्रस्ट आणि ॲटलस कॅाप्को इंडिया लिमिटेड यांचे विशेष आभार!

Share with :

Donate Now