एकश्चार्थान् न चिन्तयेत् - विदुर नीती. (महत्त्वाच्या विषयांवर एकट्याने चिंतन करू नये) गेल्या कांही वर्षांत, कोविडनंतर तर अधिकच तीव्रतेने; समाजात मानसिक आरोग्याची स्थिती सातत्याने ढासळत चालली आहे. तणाव, आत्महत्या, व्यसनं, हिंसाचार आणि मानसिक आजार यांवर सामूहिक पातळीवर मोठा लढा उभारावा लागणार आहे. सावित्रीबाई फुले मंडळ गेल्या १५ वर्षांपासून या विषयात काम करत आहे. विप्रो केअर्स च्या मदतीने चालणाऱ्या मंडळाच्या अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्पाने मानसिक आरोग्यातील स्वयंसेवी कार्यकर्ते- मानसमित्र- यांची साखळी उभी केली व त्यातून विविध उपक्रम चालू आहेत. सामूहिक मानसिक आरोग्य विषयात एकत्रित विचारमंथन होण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या रविवारी (दि. ३) अरुणोदय प्रकल्पाच्या वतीने तज्ञांची एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
त्यासंबंधी हा छोटा व्हिडीयो.
https://www.facebook.com/spmesmandal/videos/1780361445720936
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022