Friday Focus by SPMESM (175)

"No one can whistle a symphony. It takes a whole orchestra to play it!"- H E Luccock.
दुष्काळाची छाया पडलेल्या गावातील युवकांसाठी, त्यांना रोजगार मिळेल असं कांही तरी काम करावं, अशी चर्चा आमच्या फिल्ड वर्कर्सनी सुरु केली. त्यांनीच उपाय सांगितला की अर्थमुव्हिंग इक्विपमेंट (जेसीबी/ पोकलेन इत्यादी) चे ऑपरेटर म्हणून या मुलांना प्रशिक्षित केलं तर त्यांना लगेच रोजगार मिळू शकेल. पण यासाठी बऱ्याच गोष्टी जुळवून आणाव्या लागणार होत्या. दरम्यान मुंबईच्या वात्सल्य ट्रस्टने यात आधीच काम सुरु केले होते. छत्रपती संभाजीनगरला हा प्रशिक्षण वर्ग सुरु केला तर आम्ही मदत करू असं आश्वासन त्यांच्याकडून मिळालं. संस्थेचे मित्र शैलेश पार्ते यांनी हाँगकाँगचे संतोष जगताप यांना जोडून दिलं. त्यांनीही कांही आर्थिक मदत केली. संस्थेकडे एक पोकलेन मशीन देणगी मिळालेले आहे, पण दुसऱ्या प्रकारच्या यंत्रासाठी (जेसीबी) हुबळीचे देशपांडे फाउंडेशन आणि अंबाजोगाईचे मानवलोक हे मदतीला आले. छत्रपती संभाजीनगरातील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर प्रशिक्षण घेता आले. पाहता पाहता २० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले. या मुलांच्या प्रशिक्षणाबरोबरच निवास, भोजन, सुरक्षा साधनांचे संच आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण याचीही व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती. लवकरच त्यांना शिकाऊ परवाना देखील मिळेल. 
सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांतून महत्त्वाचे विषय पटकन पुढे जातात. समन्वय आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण म्हणवून या प्रशिक्षण वर्गाकडे पाहता येईल.

Share with :

Donate Now