मंजिले क्या है रास्ता क्या है
हौसला हो तो फासला क्या है..
(आलोक श्रीवास्तव)
संध्या ज्ञानेश्वर शिंदे, नरला ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतमजूरी करणारी महिला.
गरीबी, अगदी मोडकळीस आलेली झोपडी आणि अशा शंभर अडचणींनी कठीण परिस्थिती झालेली.
सावित्रीबाई फुले मंडळाने ८०००० रु कर्जस्वरूपात व १३००० रु रोख मदत देऊन त्यांच्यासाठी एका सौर वाळवण संयंत्राची (सोलर ड्रायर) व्यवस्था केली. तसेच त्यांना शेतमाल वाळवण्याचे प्रशिक्षणही दिले.
सुरुवातीला घरातून कामाला विरोध झाला परंतु काम सुरू झाल्यानंतर महिनाभरातच त्यांच्या अकाउंटला ८/९ हजार रुपये मिळाले. तेव्हापासून सर्वांचे सहकार्य मिळू लागले. स्वतःची शेती नसल्यामुळे पूर्वी त्यांना मजूरीवरच अवलंबून राहावे लागत होते. त्यात श्रम जास्त व मोबदला कमी असायचा. आता घरातल्या घरात उद्योग मिळाला व मानसिक व शारीरिक श्रम ही कमी होण्यास मदत झाली. कमाई वाढली.
तीन वर्षांमध्ये संध्या यांना दरवर्षी अंदाजे १ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळाले. त्या नियमित कर्जफेड तर करत आहेतच, यासोबतच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून (PMFME) त्यांना २८००० रु अनुदानही मिळाले.
१०२१ ला त्या मंडळाच्या ‘चाफा’ या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ सभासद झाल्या.
स्वतःच्या हिंमतीवर व कमाईवर त्या आता आपले घरही बांधत आहेत.
संध्याताईंसारख्याच एकूण २६०० महिला भाज्या वाळवणातून उत्तम कमाई करत आहेत! यासाठी सायन्स फॅार सोसायटी, डीबीएस व इतर अशा मान्यवर संस्थांचे मार्गदर्शन व मदत लाभली आहे.
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022