हे आमच्यासाठी जणू अमृतच आहे! - दगडूभाऊ वाघ, चौका, ता. जि. संभाजीनगर.
स्वच्छ, शुद्ध पेयजल ही समस्या सर्वत्र आहे. ग्रामीण भागात तर अधिकच. जंतू व हानिकारक क्षार विरहित पिण्याचं पाणी विकत घेणं सर्वांनाच परवडत नाही. त्यामुळं जलजन्य आजार सर्रास दिसतात.
सावित्रीबाई फुले मंडळाने अमृतजल प्रकल्पाद्वारे गेल्या दोन वर्षांत २० गावांत शुद्ध पेयजलासाठी आरओ प्लांटस व वॅाटर एटीएम बसवले आहेत. सुमारे १२००० ग्रामीण जनतेला त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळत आहे; ते ही अगदी नाममात्र शुल्कात! या शुल्कातून ग्रामपंचायती पुढे या संयंत्राची देखभाल करतात.
या महत्त्वाच्या उपक्रमामुळे या २० गाावंतील लोक विशेषतः महिला आनंदल्या आहेत.
मुंबईस्थित सीसीआयएल कंपनीचे विशेष आभार. त्यांच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे.
Video Link:- https://www.facebook.com/spmesmandal/videos/649784797067254/
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022
23 May, 2022