दिव्य मराठी 18-Dec-2018 औरंगाबाद जिल्हा दिव्य मराठी विशेष • सावित्रीबाई फुले संस्थेने व ग्रामस्थांनी केले गाव स्वच्छ मारसावळी येथे ग्रामस्थांनी केले श्रमदान अन् वृक्षारोपण प्रतीनिधी | बोरगाव अर्ज फुलंब्री तालुक्यातील मारसावळी येथे सावित्रीबाई फुले संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने चार दिवस श्रमदान करून गाव स्वच्छ करून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच वृक्षलागवडही करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लागणार आहे. मारसावळी येथे शनिवारपासून चार दिवस श्रमदान चालू होते. मारसावळी गावकऱ्यांना श्रमदानाचे महत्त्व चांगल्या प्रकारे पटले. गावकऱ्यांनी श्रमदानासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दर्शिवला. पहिल्या दिवशी गावशेजारील डोंगरावर फुलंब्री तालुक्यातील मारसावळी येथे श गाव स्वच्छ करताना ग्रामस्थ. छाया : पंढरीनाथ काळे, बोरगाव अर्ज. सलग समतल चर त्यांनी केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी गावातील सपाटी शेत बांधावर बांध बंदिस्ती करण्यात आली. या वेळी गावातील महिला व पुरुष यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला. यात गावकरी मंडळींनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन ३ हेक्टर वरील बांध बंदिस्ती केली. या श्रमदानाची वेळ ही सकाळी ९ ते ११ अशी होती. ज्यावेळी गाव एकत्र येते. तेव्हा कोणतीही अवघड गोष्ट साध्य होऊ शकते, ही बाब यातून सिद्ध झाली. आज शेवटच्या दिवशी मारसावळी या गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यासाठी गावातील महिला व पुरुष यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला. त्यांनी ग्रामपंचायत समोरील परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषद शाळा स्वच्छ करून ग्रामपंचायत समोर व शाळेसमोर वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी संस्थेतर्फे संदीप डफळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माधुरी गावित, सुरेश दुधे, ज्ञानेश्वर गाडेकर, शिवाजी गाडेकर, उत्तम राठोड, हरिभाऊ राठोड, लहू ठोंबरे, दिग्विजय राजगुरू, योगेश सिंगरे, केतन शर्मा, शीतल मेश्राम, योगिता फुले, गजानन इधाटे, शिवाजी पवार, प्रदीप गाडेकर, सर्जेराव हावले आदी उपस्थित होते.