'विहंग'मध्ये रंगाच्या दुनियेत दिव्यांग दिन साजरा

'विहंग'मध्ये रंगाच्या दुनियेत दिव्यांग दिन साजरा बीड बायपास : सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे या थीमवर विहंग विशेष मुलांच्या शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा झाला. यानिमित्ताने शाळेतील मुले पिवळा, हिरवा आणि पांढऱ्या वेशभूषेत आले होते. 'हक्क देऊ, संधी देऊ, दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ' हा संदेश मुलांनी यावेळी दिला. समाजकल्याण विभागाने विहंग शाळेचे क्रीडा शिक्षक व जलतरणपटू सागर बडवे आणि स्विमिंग कोच कांचन बडवे यांचा सन्मान केला. या दिनाच्या थीमनुसार विहंग शाळा वेगवेगळे प्रकल्प घेत आहे. समाजात जाऊन वस्तू विक्री करणे, ऑफिस वर्क शिकून घेण्यासोबतच या वर्षी फोटो मॉडेलिंग प्रॉडक्ट्स बनवणे, कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमात मुलांनी युवक कलाकार बनून कविता सादर करणे हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. अर्णव सदावर्ते, शंतनू घाणेकर, शंतनू महाजन, सर्वेश जोशी, हर्ष शार्दूल, वरद कुलकर्णी, हर्षदा देशमुख या मुलांनी विशेष परिश्रम घेतले.

Share with :

Donate Now