अनाथांना उबदार कपड्यांचे वाटप... - सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा उपक्रम

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ व इनरव्हील क्लब ऑफ जालना यांच्यावतीने शहरातील गरीब गरजू व अनाथ वृद्ध आजी आजोबा व लहान मुलांना थंडीसाठी शाल, स्वेटर, कान टोपी, मफलर अशा उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. मागील आठवड्यापासून कडाक्याची थंडी वाढली असून या थंडीपासून बचावासाठी अनाथ वृद्ध आजी आजोबा व अनाथ विद्यार्थ्यांना उपदार कपड्याचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळाच्या वतीने एक हिवाळा जिव्हाळयाचा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आपल्याकडे असलेल्या पण नको असलेल्या गरम व उबदार स्वेटर, शॉल, चादर, मफलर इत्यादी व अन्य गरम कपडे जे गरजुंना उपयोगी पडेल ते सर्व आणुन द्या. त्या सर्व वस्तु संस्थेमार्फत सर्वे करून नोंद करण्यात आलेल्या शहरातील गरजवंत वयोवृद्ध व अनाथ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे....

Share with :

Donate Now