सातारा परिसर, ता. १३ : सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने बीड बायपास जवळ असलेल्या विहंग विशेष शिक्षण प्रकल्पाच्या नूतन इमारतीचे गुरुवारी (ता. १२) उद्घाटन उद्योजक एक दामाणी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव अध्यक्षस्थानी होते. मुंबई येथील केशव सृष्टी संस्थेचे संस्थापक बिमल केडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी उपस्थित सातारा परिसर कार्यक्रमास उपस्थित उद्योजक, स्वयंसेवी आणि इतर. होते. यावेळी या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला. सीसीआयएल (मुंबई) सुनील साळुंके यांच्या हस्ते इमारतीतील सौरऊर्जा युनिटचे लोकार्पण झाले.