ती केंद्रामध्ये सून म्हणून आली. अर्धवट शिक्षण असले तरी तिच्यात काही करण्याची धमक होती. उत्साह होता. जी संधी मिळाली तिने ती आव्हान म्हणून स्वीकारली. आता त्याच सुनेने संशोधन प्रकल्प पूर्ण करून दाखवत केंद्रात नवा उत्साह भरला. वंदना मिलिंद सुरडकर असे तिचे नाव. आज तिच्या यशाने गवसणी घातली असली तरी भुतकाळातली वंदना आठवली की, तिची चिकाटी जिद्द आणि यशाचे दुसरे नाव तेच असावे याची खात्री पटते. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राचा प्रारंभीचा काळ होता. मिलिंदनगरमधील घरांशी संपर्क होत होता.